‘विप्लवी बांगला सोनार बांगला’ : हे पुस्तक बांगला देशच्या निर्मितीच्या काळातला आणि त्यानंतरच्या मोठ्या स्थित्यंतरांचा आलेख आहे
न्या. गोखले यांनी स्वतःच म्हटल्याप्रमाणे हे लिखाण म्हटले तर आठवणींचे आहे, म्हटले तर हे प्रवासवर्णन आहे, आणि यात काही मुलाखतीही आहेत. पण माझ्या दृष्टीने ही लेखमाला म्हणजे बांगला देशच्या निर्मितीच्या काळातील व त्यानंतरच्या मोठ्या स्थित्यंतरांचा आलेख आहे. कोणत्याही देशाच्या बाबतीत म्हणता येईल तेच बांगला देशबाबतही म्हणता येईल.......